
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार अल्लू अर्जुन आणि सुकुमार यांच्या बहुप्रतिक्षित ‘पुष्पा 2’ म्हणजेच ‘पुष्पा द रुल’ चा दमदार टीझर रिलीज झाला आहे. ८ एप्रिलला अल्लू अर्जुनचा Allu Arjun वाढदिवस आहे. म्हणूनच अल्लू अर्जुनच्या वाढदिवसापूर्वी शुक्रवारी म्हणजेच आज हा टीझर रिलीज करण्यात आला Pushpa 2 Teaser.
‘पुष्पा द रुल’ मध्ये मल्याळम इंडस्ट्री स्टार फहाद फासिल, रश्मिका मंदान्ना देखील प्रमुख भूमिकेत आहेत. देवी श्री प्रसाद हे संगीतकार आहेत आणि मैत्री मूव्ही मेकर बॅनर या प्रकल्पाचे बँकरोल करत आहेत. चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.