Pushpa is back! बहुप्रतिक्षित पुष्पा 2 चित्रपटाचा धमाकेदार टीझर लाँच

WhatsApp Group

Pushpa 2 Teaser: साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुन आज त्याचा 42वा वाढदिवस साजरा करत आहे. या खास प्रसंगी अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना यांच्या ‘पुष्पा 2’ चा टीझर रिलीज झाला आहे. ‘पुष्पा 2 द रुल’चा टीझर रिलीज होताच सोशल मीडियावर लोकप्रिय झाला आहे. ‘पुष्पा 2’ च्या टीझरलाही लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. पुन्हा एकदा पुष्प राज आणि श्रीवल्ली यांनी आपल्या दमदार शैलीने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. ‘पुष्पा 2’ च्या टीझरने येताच खळबळ उडवून दिली असून, त्यामुळे चाहत्यांची उत्सुकता आणखीनच वाढली आहे.

स्टार अल्लू अर्जुन आणि नॅशनल क्रश रश्मिका मंदान्ना यांचा ‘पुष्पा 2’ चित्रपटाचा टीझर लोकांना आवडला आहे. ‘पुष्पा 2 द रुल’च्या टीझरला रिलीज झाल्यानंतर काही मिनिटांतच यूट्यूबवर दशलक्ष व्ह्यूज मिळाले आहेत. ‘पुष्पा: द रुल’नंतर आता ‘पुष्पा 2’ बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करण्यासाठी सज्ज झाला आहे. ‘पुष्पा 2’चा टीझर पाहिल्यानंतर उत्सुकता द्विगुणित झाली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Allu Arjun (@alluarjunonline)

अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना यांच्या ‘पुष्पा 2’ चा टीझर रिलीज झाला आहे. जबरदस्त ॲक्शनसोबतच या टीझरमध्ये पुष्प राजचा दमदार लूकही पाहायला मिळात आहे.

2021 मध्ये रिलीज झालेल्या अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा: द राइज’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. आता ‘पुष्पा: द रुल’ 15 ऑगस्टला चित्रपटगृहात रिलीज होण्यासाठी सज्ज आहे. ‘पुष्पा 2’ बद्दल सांगायचे तर, सुकुमारच्या दिग्दर्शनाखाली बनत असलेला ‘पुष्पा: द रुल’ हा या वर्षातील बहुप्रतिक्षित सिक्वेल आहे. यामध्ये अल्लू अर्जुनसोबत रश्मिका मंदान्ना, फहद फासिल, जगपती बाबू यांच्यासह अनेक स्टार्स लीड रोलमध्ये दिसणार आहेत.