पंजाबी अभिनेता दीप सिद्धूचा Deep Siddhu मंगळवारी रात्री रस्ता अपघातात मृत्यू झाला आहे. अभिनेता दीप शेतकरी आंदोलनातून प्रसिद्धीच्या झोतात आला होता. दीप सिद्धू आपल्या मैत्रिणी रीना Reena Ray रायसोबत कारमधून दिल्लीहून पंजाबला परतत असताना हा अपघात झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, KMP येथील पिपली टोल प्लाझाजवळ हा अपघात झाला. त्यांची एनआरआय मैत्रिण रीना राय यांची प्रकृती स्थिर आहे.
अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री 9.30 वाजता हा अपघात झाला. दीप सिद्धू स्वतः स्कॉर्पिओ चालवत होता. या अपघातात दीप सिद्धूचा जागीच मृत्यू झाला. त्याचवेळी अनिवासी भारतीय मैत्रिण रीना हिला उपचारासाठी खारखोडा CHAC रुग्णालायामध्ये नेण्यात आले. मात्र, तिची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.
Punjabi actor Deep Sidhu dies in a road accident near Sonipat in Haryana, confirms Sonipat Police. Details awaited.
He was also earlier named as an accused in the 2021 Red Fort violence case. pic.twitter.com/CoLh8ObkJJ
— ANI (@ANI) February 15, 2022
दीप सिद्धूचा मृतदेह खारखोडा सीएचसीमध्ये ठेवण्यात आला आहे. रस्ता अपघाताची road accident माहिती मिळाल्यानंतर त्याच्या चाहत्यांमध्ये निराशा पसरली आहे. दीप सिद्धूचे नाव शेतकरी आंदोलनादरम्यान खूप चर्चेत आले होते. यासोबतच दीप सिद्धू हा दिल्लीच्या लाल किल्ल्यावरील हिंसाचार प्रकरणातही आरोपी होता.