राहुल तेवतीयाच्या धडाकेबाज खेळीने गुजरातचा पंजाबवर ६ विकेट्सने थराराक विजय

WhatsApp Group

IPL 2022 च्या 16 व्या सामन्यात गुजरात टायटन्सने Gujarat Titans पंजाब किंग्जचा Punjab Kings 6 गडी राखून पराभव केला. पंजाबने प्रथम फलंदाजी करताना गुजरातसमोर १९० धावांचे लक्ष्य ठेवले होते. गुजरातकडून शुभमन गिलने ९६ धावांची खेळी खेळली, तर राहुल तेवतीयाने शेवटच्या दोन चेंडूत दोन षटकार ठोकत गुजरातला सामना जिंकून दिला Rahul Tewatia 2 sixs in 2 ball.

मॅथ्यू वेडच्या रूपाने गुजरातला 32 धावांवर पहिला धक्का बसला. मात्र यानंतर शुभमन गिल आणि साई सुदर्शन यांनी शतकी भागीदारी करत संघाला धावसंख्येच्या जवळ आणले. शेवटच्या षटकात पंजाबने जोरदार पुनरागमन केले, पण तेवतीयाने फक्त 3 चेंडूत सामन्याचे चित्र पालटले.  गुजरातला शेवटच्या षटकात 19 धावांची गरज होती. पहिल्या चार चेंडूत फक्त 7 धावा झाल्या. अशा स्थितीत गुजरातचा विजय अशक्य वाटत होता, मात्र त्यानंतर तेवतियाने ओडियन स्मिथला दोन चेंडूंत दोन षटकार खेचून संघाला विजय मिळवून दिला. यासह गुजरातने विजयाची हॅट्ट्रिकही केली.


पंजाबच्या डावाबद्दल बोलायचे झाले तर त्यांची सुरुवात चांगली झाली नाही. कर्णधार मयांक अग्रवाल 5 आणि जॉनी बेअरस्टोने 8 धावा करून बाद झाले. पंजाबने पहिल्या दोन विकेट 34 धावांत गमावल्या होत्या. यानंतर फलंदाजीला आलेल्या लियाम लिव्हिंग स्टोनने शिखर धवनसह वेगवान धावा काढण्यास सुरुवात केली. लिव्हिंग स्टोनने 27 चेंडूत 7 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 64 धावा केल्या, तर धवनने 35 धावा केल्या.

या दोन फलंदाजांमध्ये चौथ्या विकेटसाठी 52 धावांची भागीदारी झाली. तो बाद झाल्यानंतर, पंजाबचा एकही फलंदाज जास्त वेळ क्रीझवर टिकू शकला नाही, राहुल चहरने अखेरीस 22 धावांची खेळी करत संघाला 189 धावांपर्यंत नेले. गुजरातकडून राशिद खानने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या.