आयपीएल 2022 मध्ये पंजाब किंग्सचा संघ मयंक अग्रवालच्या Mayank Agarwal नेतृत्वात मैदानात उतरणार आहे. मयांककडे १००हून अधिक आयपीएल सामन्यांचा अनुभव आहे. पंजाबचा माजी कर्णधार केएल राहुल आता लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार असणार आहे. मागच्या मोसमापर्यंत तो पंजाब संघाचा कर्णधार होता. लखनऊच्या संघाने राहुलला 17 कोटी रुपयांमध्ये आपल्या संघात घेतले आहे.
पंजाब किंग्सच्या संघाने इंडियन प्रीमियर लीग 2022 साठी अतिशय अनोखे खेळाडू खरेदी केले आहेत. पंजाबने केवळ दोनच खेळाडूंना रिटेन केले होते. सलामीवीर मयांक अग्रवाल आणि वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग यांना संघाने कायम ठेवले होते. यंदाच्या लिलावात पंजाबने एकूण २३ खेळाडूंना खरेदी केले. बंगळुरूमध्ये झालेल्या या कार्यक्रमात त्याने शिखर धवनला 8.50 कोटी रुपयांना खरेदी केले. त्याच वेळी, दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडासाठी, संघाने 9.25 कोटी रुपये दिले. इंग्लंडचा जॉनी बेअरस्टोला 6.75 कोटी आणि वेस्ट इंडिजचा अष्टपैलू ओडियन स्मिथला 6 कोटी देऊन संघात सामील करून घेतले आहे.
आयपीएल 2022 साठी असा आहे पंजाब किंग्सचा संपूर्ण संघ punjab kings squad 2022
मयंक अग्रवाल (12 करोड )
अर्शदीप सिंह (4 करोड )
कगीसो रबाडा (9.25 करोड )
शिखर धवन (8.25 करोड)
जॉनी बेयरेस्टो (6.75 करोड)
राहुल चाहर (5.25 करोड)
हरप्रीत बरार (3.8 करोड)
जितेश शर्मा (20 लाख )
प्रभसिमरन सिंह (60 लाख)
शाहरुख खान (9 करोड )
इशान पोरेल (25 लाख )
लियाम लिविंगस्टोन (11.50 करोड)
ओडियन स्मिथ (6 करोड)
संदीप शर्मा (50 लाख )
राज बावा (2 करोड)
रिषि धवन (55 लाख )
प्रेरक मांकड (20 लाख )
वैभव अरोड़ा (2 करोड )
रितिक चटर्जी (20 लाख )
बलतेज ढांडा (20 लाख )
अंश पटेल (20 लाख )
नैथन एलिस (75 लाख )
अथर्व ताएडे (20 लाख )
भानुका राजपक्षा (50 लाख )
बैनी होवैल (40 लाख रुपये)