IPL 2023: पंजाब किंग्जने रोमहर्षक सामन्यात राजस्थान रॉयल्सचा 5 धावांनी पराभव केला. पंजाब किंग्जसाठी शेवटच्या सामन्यात एका खेळाडूने शानदार गोलंदाजी केली. या खेळाडूमुळेच पंजाब किंग्जचा संघ सामना जिंकू शकला. आयपीएल 2023 मधील पंजाब किंग्जचा हा सलग दुसरा विजय आहे. यासह, संघाचे 2 सामन्यांत 2 विजयांसह चार गुण झाले आहेत. राजस्थान रॉयल्सला शेवटच्या षटकात विजयासाठी 18 धावांची गरज होती. त्यानंतर कर्णधार शिखर धवनने सॅम करणकडे चेंडू सोपवला आणि शेवटच्या षटकात करणने अप्रतिम गोलंदाजी करत 18 धावा वाचवल्या. त्याने शिमरॉन हेटमायरला शानदारपणे धावबाद केले. शेवटच्या षटकात त्याने एकही वाईड आणि नो बॉल टाकला नाही. आणि पंजाब किंग्जने हा सामना जिंकला.
राजस्थान रॉयल्ससाठी जोस बटलरच्या जागी रविचंद्रन अश्विनला सलामीला पाठवले, पण तो फलंदाजीत कमाल दाखवू शकला नाही आणि त्याचे खातेही उघडू शकला नाही. त्याचवेळी युवा सलामीवीर यशस्वी जैस्वालला केवळ 8 धावा करता आल्या. यानंतर कर्णधार संजू सॅमसन आणि बटलरने डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला, पण बटलर बाद होताच राजस्थानचा डाव गडगडला. बटलरने 19 धावा केल्या. नॅथन एलिसने त्याचा सर्वोत्तम झेल घेतला. सॅमसनने 42 धावा केल्या. त्याचवेळी देवदत्त पदीकलने 21 धावांची खेळी केली. रियान पराग या सामन्यात विशेष काही दाखवू शकला नाही आणि केवळ 20 धावा करून बाद झाला.
That’s that from Match 8. @PunjabKingsIPL win their second game on the trot as they beat #RR by 5 runs.
Scorecard – https://t.co/Cmk3rElYKu #TATAIPL #RRvPBKS #IPL2023 pic.twitter.com/R9j1jFpt5C
— IndianPremierLeague (@IPL) April 5, 2023
शिमरॉन हेटमायरने शानदार फलंदाजी केली. त्याने जमिनीवर फटके मारले. त्याच्या धडाकेबाज फलंदाजीसमोर पंजाब किंग्जचे गोलंदाज टिकू शकले नाहीत. त्याचवेळी ध्रुव जुरेलने त्याला उत्तम साथ दिली. 6 विकेट्स बाद झाल्यानंतर या दोन्ही फलंदाजांनी आपल्या फलंदाजीने सर्वांची मने जिंकली, मात्र हे खेळाडू राजस्थानला विजय मिळवून देऊ शकले नाहीत. हेटमायरने 36 आणि ध्रुवने 32 धावा केल्या.
पंजाब किंग्जसाठी नॅथन एलिसने अप्रतिम कामगिरी केली. त्याने आपल्या गोलंदाजीने सर्वांची मने जिंकली. अर्शदीप सिंगला २ बळी मिळाले. शेवटच्या षटकांमध्ये पंजाब किंग्जच्या गोलंदाजांना आपली लय कायम ठेवता आली नाही आणि त्यांनी भरपूर धावा लुटल्या. पण सॅम करनमुळे पंजाब किंग्जला सामना जिंकता आला. एलिसने आपल्या चार षटकात 30 धावा देत 4 बळी घेतले.
पंजाब किंग्जने राजस्थान रॉयल्सला विजयासाठी 198 धावांचे लक्ष्य दिले आहे. पंजाब किंग्जकडून प्रभसिम्सन सिंग आणि शिखर धवन यांनी शानदार खेळी केली. प्रभासिमरनने 60, धवनने 86 धावा केल्या. त्याचवेळी जितेश शर्माने 27 धावांचे योगदान दिले. भानुका राजपक्षे, सिकंदर रझा आणि सॅम करन अवघ्या एका धावेवर बाद झाले. राजस्थानकडून जेसन होल्डरने सर्वाधिक 2 बळी घेतले. युझवेंद्र चहल आणि रविचंद्रन अश्विन यांच्या खात्यात 1-1 विकेट जमा झाली.
राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्ज यांच्यातील सामना गुवाहाटीच्या मैदानावर झाला. दोन्ही संघांनी पहिला सामना जिंकला आहे. संजू ससूनच्या नेतृत्वाखालील राजस्थानने सनरायझर्स हैदराबादचा 72 धावांनी पराभव केला. त्याचवेळी शिखर धवनच्या नेतृत्वाखाली पंजाब किंग्जने केकेआरचा 7 धावांनी पराभव केला.
आयपीएलमध्ये आतापर्यंत राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात 24 सामने झाले आहेत, ज्यामध्ये राजस्थान रॉयल्सचा वरचष्मा राहिला आहे. राजस्थानने 14 सामने जिंकले आहेत. त्याचबरोबर पंजाब किंग्जने 10 सामन्यांत विजय मिळवला आहे. दोन्ही संघांकडे स्टार खेळाडूंची फौज आहे.
पंजाब किंग्जची प्लेइंग इलेव्हन:
शिखर धवन, प्रभसिमरन सिंग, भानुका राजपक्षे, जितेश शर्मा (विकेटकीपर), शाहरुख खान, सॅम कुरान, सिकंदर रझा, नॅथन एलिस, हरप्रीत ब्रार, राहुल चहर, अर्शदीप सिंग
राजस्थान रॉयल्सची प्लेइंग इलेव्हन:
यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (विकेटकीपर), देवदत्त पडिक्कल, रियान पराग, शिमरॉन हेटमायर, जेसन होल्डर, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, केएम आसिफ, युझवेंद्र चहल.