IPL 2022: पंजाब किंग्जकडून मुंबई इंडियन्सचा 12 धावांनी पराभव

WhatsApp Group

IPL च्या 15 व्या मोसमातील 23 वा सामना मुंबई इंडियन्स Mumbai Indians आणि पंजाब किंग्ज Punjab Kings यांच्यात खेळवण्यात आला. या सामन्यात पंजाब किंग्जने मुंबई इंडियन्सचा 12 धावांनी पराभव करत दमदार विजय मिळवला आहे. या मोसमातील मुंबई इंडियन्सचा हा सलग 5वा पराभव आहे.

या सामन्यात पंजाब किंग्जने प्रथम फलंदाजी करत मोठी धावसंख्या उभारली होती. कर्णधार मयंक अग्रवाल आणि शिखर धवनच्या झटपट खेळीच्या जोरावर पंजाब किंग्जने 198 धावा केल्या होत्या. मयंक अग्रवाल आणि शिखर धवन या जोडीने 97 धावा जोडल्या आणि आपल्या संघासाठी हंगामातील सर्वात मोठी भागीदारी केली. कर्णधार मयंक अग्रवाल फॉर्ममध्ये परतला आणि त्याने झंझावाती 52 धावा केल्या. शिखर धवननेही पंजाब संघासाठी सर्वाधिक 50 चेंडूत 70 धावा केल्या. त्याच्या या शानदार खेळीत 5 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता.

पंजाबच्या फलंदाजांनी धुलाई करत मुंबईच्या संघाला 199 धावांचे मोठे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना रोहित शर्माने चांगली सुरूवात केली होती पण तो लवकर बाद झाला. रोहित शर्मा 28 धावा करत बाद झाला तर ईशान किशन फक्त 3 धावा करत तंबूत परतला. त्यानंतर डेवाल्ड ब्रेविस आणि तिलक वर्मा यांनी दमदार फटकेबाजी सुरू ठेवली. डेवाल्ड ब्रेविस 25 चेंडूत 49 धावा करत बाद झाला. तर तिलक वर्मा 20 चेंडूत 36 धावा करत धावबाद झाला. सूर्यकुमार यादव 30 चेंडूत 43 धावा करत बाद झाला.

ओडियन स्मिथची धारदार गोलंदाजी – पंजाबच्या गोलंदाजीबद्दल बोलायचे तर, ओडियन स्मिथने 3 षटकांत 30 धावा देत सर्वाधिक 4 बळी घेतले. स्मिथने सामन्याच्या अखेरच्या षटकात तब्बल मुंबईच्या 3 फलंदाजांना माघारी धाडले. पंजाबच्या कागिसो रबाडाने 4 षटकांत 29 धावा देत 2 बळी तर वैभव अरोराने 4 षटकांत 43 धावा देत 1 बळी घेतला.

मुंबईकडून गोलंदाजी करताना बेसिल थंपीने 2 तर उनाडकट, बुमराह आणि मुरूगन अश्विनने 1 बळी टिपला. आजच्या सामन्यात टायमल मिल्स मात्र एकही गडी बाद करता आला नाही. विशेष म्हणजे, सर्व फलंदाजांनी आपापली 4 षटके पूर्ण केली. त्यात जसप्रीत बुमराहला सर्वात कमी मार (28 धावा) पडला.

मुंबई इंडियन्सचा संघ – रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, डेवाल्ड ब्रेविस, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, किरॉन पोलार्ड, जयदेव उनाडकट, मुरुगन अश्विन, जसप्रीत बुमराह, टायमल मिल्स, बेसिल थम्पी

पंजाब किंग्जचा संघ – मयंक अग्रवाल (कर्णधार), शिखर धवन, जॉनी बेअरस्टो, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा, ओडियन स्मिथ, शाहरुख खान, कागिसो रबाडा, राहुल चहर, वैभव अरोरा, अर्शदीप सिंग