IPL 2025: पंजाब किंग्ज (PBKS) ने इंडियन प्रीमियर लीग 2025 साठी त्यांचा कर्णधार जाहीर केला आहे. पंजाब किंग्जने त्यांच्या नवीन कर्णधाराची घोषणा एका अनोख्या पद्धतीने केली. बिग बॉस 18 च्या वीकेंड का वार एपिसोडमध्ये सुपरस्टार सलमान खानने श्रेयस अय्यरला पंजाब किंग्जचा कर्णधार म्हणून घोषित केले.
यावेळी श्रेयस अय्यरसोबत युजवेंद्र चहल आणि शशांक सिंग देखील उपस्थित होते. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली केकेआरने आयपीएल 2024 चे विजेतेपद जिंकले. आयपीएल मेगा लिलावात पंजाब किंग्जने श्रेयस अय्यरला 26.75 कोटी रुपयांना खरेदी केले. तो आयपीएलमधील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात महागडा खेळाडू आहे.
2020 मध्ये अय्यरने दिल्ली संघाला त्याच्या नेत्तूत्वात फायनलमध्ये नेले होते पण अंतिम सामन्यात त्यांना मुंबई इंडियन्स (एमआय) कडून पराभव पत्करावा लागला. त्यानंतर दिल्लीने 2021 च्या हंगामात अय्यरच्या जागी ऋषभ पंतला कर्णधार म्हणून नियुक्त केले. नंतर २०२२ मध्ये, अय्यरला केकेआरने विकत घेतले. त्याने दोन हंगाम केकेआरचे नेतृत्व केले. त्याने केकेआरला जेतेपद मिळवून दिले.
आयपीएल 2025 साठी पंजाब संघ
शशांक सिंग, प्रभसिमरन सिंग, अर्शदीप सिंग, श्रेयस अय्यर, युजवेंद्र चहल, मार्कस स्टोइनिस, ग्लेन मॅक्सवेल, नेहल वधेरा, हरप्रीत ब्रार, विष्णू विनोद, विजयकुमार वैशाख, यश ठाकूर, मार्को जानसेन, जोश इंग्लिस, लॉकी फर्ग्युसन, अझमतुल्ला उमरझाई, हरनूर पन्नू, कुलदीप सेन, प्रियांश आर्य, आरोन हार्डी, मुशीर खान, सूर्यांश शेडगे, झेवियर बार्टलेट, पायला अविनाश, प्रवीण दुबे.