पंजाबमधील विधानसभेच्या 117 जागांसाठी आज होत आहे मतदान!

WhatsApp Group

पंजाब राज्यातील 117 विधानसभा Punjab Assembly Elections 2022 जागांवर नशीब आजमावणाऱ्या 1304 उमेदवारांचे भवितव्य ठरवण्यासाठी आज 2.14 कोटींहून अधिक मतदार मतदान करतील. यामध्ये 93 महिला उमेदवारांचाही समावेश आहे. यूपीमध्येही तिसऱ्या टप्प्यात 16 जिल्ह्यांतील 59 विधानसभा जागांसाठी आज मतदान होणार आहे.

पंजाबमधील 117 विधानसभा मतदारसंघात सकाळी 8 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. पंजाबमध्ये विधानसभेच्या 117 जागांसाठी एकूण 24740 मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. यापैकी 2013 मतदान केंद्रे संवेदनशील म्हणून चिन्हांकित करण्यात आली आहेत. मुक्त आणि निष्पक्ष मतदानासाठी सर्व तयारी पूर्ण झाल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे.

पंजाबमध्ये प्रशासनाने मतदानासाठी चोख सुरक्षा व्यवस्था केली आहे. पोलिसांसोबतच केंद्रीय दलाचे जवानही मतदान केंद्रांवर तैनात असतील. मतदान केंद्राभोवती कलम 144 लागू करण्यात आले आहे. मतदानाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने दुकाने, कारखाने किंवा इतर संस्थांमध्ये काम करणाऱ्या मजुरांना पगारी सुट्टीही जाहीर केली आहे.