
पुणे – शिवाजी रस्त्यावरील दत्त मंदीरापासुन काही अंतरावर असलेल्या एका ‘टि हाऊस’ समोर एक बेवारस वस्तु आढळल्यामुळे बॉम्ब असल्याची अफवा गुरुवारी दुपारी 2 वाजता पसरली.
दरम्यान बॉम्ब शोधक व नाशक पथकाला (बीडीडीएस) याबाबत माहिती मिळताच पथक घटनास्थली दाखल झाले. पथकाचे जवान व श्वानाने बेवारस वस्तुची पाहणी केली, मात्र त्यामध्ये संशयास्पद असं काहीही आढळले नाही. अशी माहिती फरासखाना पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक किशोर नावंदे यांनी सांगितले.