
पुणे – पंजाबी गायक आणि काँग्रेसचे नेते सिद्धू मूसेवाला (Punjabi Singer Sidhu Moosewala) हत्या प्रकरणात पुणे ग्रामीण कनेक्शन समोर आलं होतं. या प्रकरणात सौरभ महाकाळनंतर आता पुणे पोलिसांना दुसरा आरोपी संतोष जाधव (Police arrested Santosh Jadhav) याला अटक करण्यात मोठं यश आलं आहे. त्याला पोलिसांनी गुजरातमधून अटक केली आहे. या प्रकरणात एकूण आठ आरोपी असल्याचं समोर आलं आहं. त्यापैकी पुण्यातील सौरभ महाकाळ आणि संतोष जाधव या दोघांची नावंही समोर आली होती.
पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला खून प्रकरणातील शूटर संतोष जाधव याला पुणे पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. एका अधिकाऱ्याने सोमवारी ही माहिती दिली. जाधव हा सिद्धू मूसेवाला हत्याकांडातही वॉन्टेड संशयित होता. पुणे ग्रामीण पोलिसांनी मूसेवाला खून प्रकरणातील संशयित जाधव याच्या साथीदारालाही अटक केली आहे.
संतोष जाधवला रविवारी रात्री उशिरा न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आलं. 20 जूनपर्यंत त्याला पोलीस कोठडी देण्यात आली आहे. पोलिसांनी संतोष जाधवच्या टोळीतील आणखी एकाला अटक केली आहे.