Pulwama Encounter: भारतीय लष्कराला मोठे यश; लष्कर-ए-तोयबाच्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा

WhatsApp Group

जम्मू-काश्मीर – जम्मू-काश्मीर (Jammu Kashmir) मधील पुलवामा (Pulwama) येथे शनिवारपासून सुरू झालेल्या चकमकीत सुरक्षा दलाने तीन दहशतवाद्यांचा खात्मा (three terrorist killed) केला आहे. चकमकीत ठार झालेले हे तिन्ही दहशतवादी लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेशी संबंधित होते. काश्मीर झोनच्या पोलिसांनी ट्विट करुन याबाबत माहिती दिली आहे.

जम्मू-काश्मीर पोलिसांनी सकाळी ट्विट करत म्हटले की, “आज आणखी दोन दहशतवादी मारले गेले आहेत. एकूण तीन दहशतवाद्यांना आतापर्यंत ठार करण्यात यश आले आहे. या दहशतवाद्यांकडे मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्र आणि दारूगोळा तसेच काही साहित्य होते हे सर्व जप्त करण्यात आले आहे.

काश्मीरचे आयजीपी विजय कुमार यांनी सांगितले, की तिन्ही दहशतवादी पुलवामा येथील रहिवासी होते. ते दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाशी संबंधित होते. याच दहशतवाद्यांनी 13 मे रोजी आमचे सहकारी शहीद रियाझ अहमद यांची हत्या केली होती. इरफान मलिक, फजिल नजीर भट याच्याकडून दोन एके-47 रायफल आणि एक पिस्तूलसह मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. त्यात 303 रायफल, 23 राऊंड काडतुसे, एक पिस्तूल आणि 31 राऊंड काडतुसे, एक हँडग्रेनेड तसेच इतर साहित्याचा समावेश आहे.