Cheteshwar Pujara: कर्णधार बनताच पुजाराने केला कहर! काऊंटी क्रिकेटमध्ये झळकावलं पाचवं शतकं

WhatsApp Group

Cheteshwar Pujara: खराब फॉर्ममुळं भारतीय कसोटी संघातून वगळलेल्या भारताचा स्टार फलंदाज चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) इंग्लंडच्या गोलंदाजांची शाळा घेत आहे. इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या काऊंटी क्रिकेटमध्ये कर्णधार बनताच त्याने शानदार शतक झळकावले आहे. तर दुसरीकडे, भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदरने सुद्धा काऊंटी क्रिकेटच्या पदार्पणाच्या सामन्यात 4 बळी घेत शानदार सुरुवात केली.

मिडलसेक्सविरुद्ध चेतेश्वर पुजाराला ससेक्सच्या संघाचे कर्णधारपद मिळाले. दरम्यान, मिडलसेक्सविरुद्ध चौथ्या क्रमांकावर खेळण्यासाठी आलेल्या चेतेश्वर पुजारानं दमदार शतक झळकावलं आहे. पुजारानं पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 182 चेंडूत 10 चौकार आणि एका षटकारांच्या मदतीने नाबाद 115 धावांची खेळी केली. पुजारानं 144 चेंडूत त्याचं शतक झळकावलं. या हंगामातील त्यांचं पाचवं शतक आहे. या हंगामात त्यानं आधीच दोन दुहेरी शतकसह चार शतक झळकावली आहेत. या काऊंटी क्रिकेट लीगमध्ये चेतेश्वर पुजारा सातत्याने चांगल्या धावा करताना दिसत आहे.

पुजाराने इंग्लंडच्या काऊंटी क्रिकेटमध्ये आतापर्यंत 881 धावा केल्या आहेत. ज्यात दोन दुहेरी शतकांसह पाच शतक ठोकली आहेत. काऊंटी क्रिकेटमध्ये या हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत पुजारा हा स्थानी आहे. त्याच्यापुढं शान मसूद आणि बेन डुकेट हे आहेत. दोघांनी प्रत्येकी 1000-1000 हून जास्त धावा केल्या आहेत. परंतु, या हंगामात सर्वाधिक शतक ठोकणाऱ्या फलंदाजाच्या यादीत चेतेश्वर पुजारा पहिल्या स्थानी आहे.