देशाची महान धावपटू पीटी उषा यांची राज्यसभेवर निवड, पंतप्रधान मोदींनी ट्विट करत केले अभिनंदन

WhatsApp Group

देशाची महान धावपटू पीटी उषा यांची राज्यसभेवर निवड झाली आहे. पंतप्रधान मोदींनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. पीटी उषांबद्दल माहिती देताना पीएम मोदी म्हणाले की पीटी उषा त्यांच्या क्रीडा क्षेत्रातील कामगिरीसाठी सर्वत्र ओळखल्या जातात, परंतु नवोदित खेळाडूंना मार्गदर्शन करण्याचे त्यांचे कामही तितकेच कौतुकास्पद आहे. राज्यसभेवर उमेदवारी मिळाल्याबद्धल अभिनंदन.

देशातील महान धावपटू पीटी उषा यांच्यासह  संगीतकार इलैयाराजा, वीरेंद्र हेगडे आणि व्ही. विजयेंद्र प्रसाद यांनाही राज्यसभेवर पाठवले जात आहे. पीएम मोदींनीही ट्विट करून त्यांचे अभिनंदन केले आहे.