यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात पार पडला पं.रघुनंदन पणशीकर यांचा षष्ट्यब्दीपूर्ती सोहळा

WhatsApp Group

पं.रघुनंदन पणशीकर यांचा षष्ट्यब्दीपूर्ती सोहळा गुरुवारी, दिनांक ६ एप्रिल रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात पार पडला. या सोहळ्यानिमित्त पंडित रघुनंदन पणशीकर यांच्या निवडक रचनांचे सादरीकरण त्यांच्या शिष्यपरिवारातर्फे झाले. सत्कार समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून पद्मविभूषण पं.हरिप्रसाद चौरसिया, तालयोगी पं.सुरेश तळवलकर, ख्यातनाम गायिका देवकी पंडित हे उपस्थित होते . पं.रघुनंदन पणशीकर यांची प्रकट मुलाखत सौ.चिन्मयी सुमीत यांनी त्यांच्या अनोख्या शैलीमध्ये घेतली आणि रघुदादांच्या जीवनाचे पैलू त्या मुलाखतीतून सर्व प्रेक्षकांपर्यंत पोहचले. ह्या नंतर रघुदादांच्या जीवनावर आधारित एक शॉर्ट फिल्म दाखवण्यात आली.

रघुदादांच्या ‘गानसरस्वती को भजे हम’ बंदिशीमुळे कार्येक्रमाला चार चांद लागले. ह्या कार्येक्रमाला केतकी माटेगांवकर, मिलिंद जोशी, तन्मय देवचके, हेमंत पेंडसे, सायली पानसे , सावनी शेंडे, अलका देव मारुलकर, शौनक अभिषेकी, मधुवंती देव, मिलिंद तुळाणकर, प्रमोद मराठे, परिणीता मराठे, सुवर्णा माटेगांवकर, पराग माटेगांवकर, श्री. पेंढारकर, श्री गोविंद बेडेकर, मंजुषा पाटील, मंजिरी असनारे, मंगेश बोरगांवकर हे मान्यवर देखील उपस्थित होते. ह्या कार्येक्रमाचे आयोजन रघुनंदन पणशीकरांच्या परिवार आणि शिष्यवर्गानी केले होते.