
लखनऊ – मोहम्मद पैगंबरांविरोधात भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्माच्या वक्तव्याविरोधात उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh News) मुस्लीम समुदायाने विविध ठिकाणी आंदोलन केलं आहे. प्रयागराज, लखनऊ, मुरादाबाद आणि सहारनपूरमध्ये गोंधळ आणि घोषणाबाजी झाली. प्रयागराजमध्ये परिस्थिती अधिकच बिघडली आहे.
येथील अटाला येथे जुमेच्या नमाजानंतर घोषणाबाजी झाली. पोलिसांनी थांबवण्याचा प्रयत्न केला होता, मात्र त्याचवेळी दगडफेक सुरू झाली. पोलिसांनी लाठीहल्ला करून उपद्रव करणाऱ्या लोकांना ताब्यात घेतले आहे. यानंतरही उपद्रवी शांत झाले नाही. त्यामुळे अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. यावेळी हवेत गोळीबारही करण्यात आला. दगडफेकीमध्ये आयजी राकेश सिंह हेही जखमी झाले आहेत. याशिवाय अनेक पोलीस जखमी झाले आहेत. यानंतर बडे अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले आहेत.
#WATCH Uttar Pradesh: Protest erupted in Pyaragraj over inflammatory statements of suspended BJP leader Nupur Sharma and expelled BJP leader Naveen Kumar Jindal pic.twitter.com/aipfBdvica
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) June 10, 2022
प्रयागराजमध्ये डीएम संजय कुमार खत्री आणि एसएसपी अजय कुमार हे देखील शुक्रवारच्या नमाजपूर्वी चौक जामा मशिदीबाहेर पोहोचले आणि लोकांना शांततेच आवाहन केलं आहे.