दिल्लीच्या शाही जामा मशिदीजवळ नुपूर शर्मा यांच्या विरोधात निदर्शने, नुपूर शर्मा-नवीन जिंदाल यांच्या अटकेची मागणी

WhatsApp Group

नवी दिल्ली – पैगंबर मोहम्मद यांच्यावर कथित टिप्पणी केल्याप्रकरणी भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांच्या अटकेवरून दिल्लीमधील जामा मशिदीबाहेर निदर्शने (Protests continue outside) सुरू आहेत. शुक्रवारच्या नमाजानंतर लोकांनी जामा मशिदीबाहेर जोरदार निदर्शने केली. तसेच नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांच्या अटकेची मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी जामा मशिदीबाहेर मोठी गर्दी दिसून आली. मात्र, पोलीसही घटनास्थळी तैनात असून लोकांना समजवण्याचा प्रयत्न करत आहेत.

न्यूज एजन्सी ANI नुसार दिल्ली पोलिसांनी सांगितले की, भाजपच्या निलंबित नेत्या नुपूर शर्मा आणि भाजप नेते नवीन कुमार जिंदाल यांच्या वक्तव्याविरोधात लोकांनी जामा मशिदीत निदर्शने केली. आम्ही लोकांना तेथून हटवले असून परिस्थिती आता नियंत्रणात आली आहे.