राष्ट्रपतींच्या बेडरुममध्ये आंदोलक खेळले WWE; पहा व्हायरल Video

WhatsApp Group

श्रीलंका सध्या आर्थिक दिवाळखोरीचा सामना करत असताना नागरिकांमध्ये देखील प्रचंड रोष आहे. देशातील महागाईने हाहाकार केला आहे. श्रीलंका सरकार नागरिकांच्या रोषाला सामोरं जात असताना आंदोलकांनी आता थेट श्रीलंकेच्या राष्ट्रपती भवनावरही ताबा मिळवला आहे. आंदोलक राष्ट्रपती भवनातील स्विमिंग पूल, किचन आणि लिविंग रुममध्ये धमाल करत असतानाचे व्हिडिओ समोर आले आहेत.

आता राष्ट्रपतींच्या बेडरुममध्येही आंदोलक मखमली गादीवर उड्या मारतानाचा आणि WWE खेळतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये आंदोलक नाचताना आणि धुमाकूळ घालताना दिसत आहेत. एवढेच नव्हे, तर राष्ट्रपतींच्या बेडवर मखमली गादीवर चक्क WWE खेळताना दिसत आहेत. WWE मधील समालोचनाचा ऑडिओ जोडून एक व्हिडिओ सध्या ट्विटरवर व्हायरल होत आहे. यात काही तरुण राष्टपतींच्या बेडरुममधील बेडवर दंगा करताना पाहायला मिळत आहेत.

आंदोलकांनी राष्ट्रपती भवनातील स्विमिंग पूलचाही आनंद घेतला. स्विमिंग पूलमध्ये आंदोलक मजा करतानाचे व्हिडिओ काल सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

अनेक जण राष्ट्रपती भवनामध्ये घुसून बेडवर लोळून सेल्फी टिपताना दिसत आहेत. तसेच राष्ट्रपती भवनातून जे जे काही आपल्याला पळवून नेता येईल ते सर्व काही आंदोलन घेऊन जातानाही दिसत आहे.