मसाज सेंटरच्या नावाखाली चालायचा वेश्याव्यवसाय; पोलिसांचा छापा, व्यवस्थापकाला केली अटक

WhatsApp Group

पुणे – पुण्यातील (Pune) विमाननगर (viman nagar) भागामध्ये मसाज सेंटरच्या (spa center) नावाने सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकला. या कारवाईमध्ये मसाज सेंटरच्या व्यवस्थापकाला अटक करण्यात आली असून वेश्याव्यवसाय करणाऱ्या तीन महिलांना अटक करण्यात आली आहे.

या प्रकरणी मसाज सेंटरचा व्यवस्थापक 19 वर्षीय इमदादुल्ला इस्माईल अली याला अटक करण्यात आली आहे. मसाज सेंटरचे मालक शंतनू सरकार, शमशुद्दीन आणि जयराम वालपुली यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विमाननगर येथील गल्ली क्रमांक तीनवरील अमेय स्पा नावाच्या बंगल्यामध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याचं गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाचे पोलिस निरीक्षक राजेश पुराणिक यांना आढळून आले, त्यानंतर त्यांनी छापा टाकला आहे.

‘जस्ट डायल’वर विमाननगर परिसरातील मसाज पार्लरबाबत माहिती उपलब्ध होती.स्पा सेंटरमधील कामगारांकडून संबंधित व्यक्तीशी संपर्क साधला जात होता. त्यानंतर त्याला ग्राहक बनवून मसाजच्या नावाखाली जास्तीचे पैसे उकळल्या जात होते. जास्त पैसे उकळून वेश्याव्यवसाय केला जात होता, अशी माहिती पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये पुढे आली आहे.