Maharashtra Board Exam Time Table : दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर

WhatsApp Group

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी- मार्च 2023 मध्ये घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावी व बारावीच्या लेखी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक सोमवारी जाहीर करण्यात आलं आहे. बारावीची लेखी परीक्षा 21 फेब्रुवारी ते 20 मार्च 2023 या कालावधीत, तर दहावीची लेखी परीक्षा 2 मार्च ते 25 मार्च या कालावधीत होणार आहे.

दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक पाहण्यासाठी बोर्डाच्या mahahsc.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्या. संभाव्य वेळापत्रक मंडळाच्या अधिकृत www.mahahsscboard.in या वेबसाईटवर उपलब्द करुन देण्यात आले आहे.

मंडळाच्या वेबसाईटवरील संभाव्य वेळापत्रकांची सुविधा ही फक्त माहितीसाठी आहे. परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा / उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालय यांच्याकडे छापील स्वरूपात देण्यात येणारे वेळापत्रक अंतिम असेल.