स्विमिंग पूलमध्ये डान्स करताना दिसली प्रियांका, पाहा व्हिडिओ

WhatsApp Group

अभिनय, फॅशन, हटके लूकमुळे प्रियांका चोप्राचा चाहतावर्ग सातासमुद्रापलिकडे पोहोचला. सोशल मीडियावर तर तिचे लाखो चाहते आहेत. एखादा फोटो, व्हिडीओ तिने पोस्ट केला की काही मिनिटांमध्येच तिच्या पोस्टवर लाईक्स, कमेंट्सचा वर्षाव हा होत असतो. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात राहते.

प्रियांकाचा असाच एक व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. या व्हिडीओमध्ये ती स्विमिंग पूलमध्ये डान्स करताना दिसतेय. काळ्या रंगाच्या बिकनी लूकमुळे प्रियांका या व्हिडीओमध्ये अधिक उठून दिसत आहे. प्रियांकाने हा व्हिडीओ पोस्ट करताच काही मिनिटांमध्येच नेटकऱ्यांनी याला पसंती देखील दिली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Priyanka (@priyankachopra)

प्रियांका सध्या तिच्या संसारामध्ये चांगलीच रमली आहे. कुटुंबासोबत अधिकाधिक एकत्रित वेळ घालवणं तिने पसंत केले आहे. ती परदेशात राहत असली तरी तिथे भारतीय संस्कृतीप्रमाणे प्रत्येक सण प्रियांका साजरा करते. यामध्ये तिच्या सासरच्या मंडळींचा देखील समावेश असतो.