बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री प्रियांका चोप्रा बनली आई, सोशल मीडियावर खळबळ

WhatsApp Group

मुंबई – बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री प्रियांका चोप्रा आई बनली आहे. ही बातमी आल्यानंतर चाहत्यांमध्ये आणि त्यांच्या कुटुंबियांमध्ये आनंदाची लाट पसरली आहे. प्रियांकाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर याबाबत आपल्या चाहत्यांना माहिती दिली आहे.

सरोगसीच्या माध्यमातून प्रियांका चोप्रा आणि निक जोनस आईबाबा झाले आहेत. प्रियांकाने एक पोस्ट शेअर करून ही माहिती दिली आहे. प्रियंका चोप्रा आणि निक जोनास 2018 लग्नबंधनात अडकले होते. बॉलिवूडमध्ये आजवर अनेक जोडपी सरोगसीच्या माध्यमातून आई वडील बनले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Priyanka (@priyankachopra)

आमच्यासठी हा खूप आनंदाचा क्षण असून त्याकरता सगळ्यांनी आम्हाला प्रायव्हसी द्यावी अशी विनंती प्रियांका चोप्रा आणि निक जोनस यांनी सोशल मीडियाद्वारे केली आहे.