Priya Berde : प्रिया बेर्डे यांनी राष्ट्रवादीला ठोकला रामराम! भाजपमध्ये केला प्रवेश

WhatsApp Group

मराठी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकत भाजपामध्ये प्रवेश केला आहे. प्रिया बेर्डे यांनी आज नाशिक येथे भाजपामध्ये प्रवेश केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत प्रिया बेर्डे यांनी भाजपाचा झेंडा हाती घेतला आहे.

प्रिया बेर्डे यांनी 2020 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत त्यांनी हातात राष्ट्रवादीच घड्याळ बांधलं होतं. परंतु, अवघ्या दोनच वर्षात त्यांनी राष्ट्रवादीला रामराम करत भाजपात प्रवेश केला आहे.