
आयपीएलच्या १५ (IPL) व्या मोसमात युवा क्रिकेटर पृथ्वी शॉची (Prithvi Shaw) बॅट फार काही चांगली कामगिरी करू शकली नाही. दिल्ली कॅपिटल्सच्या या सलामीवीराने हंगामात 10 सामने खेळले आणि 28.30 च्या सरासरीने एकूण 283 धावा केल्या.त्याने २ अर्धशतके झळकावली पण काही महत्त्वाच्या प्रसंगी तो स्वत:ला सिद्ध करू शकला नाही. त्याला टायफॉइडही झाला त्यामुळे त्याला काही सामन्यांतून बाहेर पडावे लागले. आता पृथ्वी रणजी ट्रॉफीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात मुंबई संघाचे कर्णधारपद सांभाळत आहे.
पृथ्वी शॉने सोमवारी उत्तराखंडविरुद्धच्या रणजी ट्रॉफीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यामध्ये नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. पृथ्वी ओपनिंगला गेला आणि पहिल्या डावात फक्त २१ धावा करून बोल्ड झाला. त्याला उत्तराखंडचा गोलंदाज दीपक धापोलाने बोल्ड केले, त्यामुळे मुंबईची पहिली विकेट 36 धावांवर पडली.
यानंतर यशस्वी जैस्वालही 35 धावा करून दीपकच्या बॉलवर आउट झाला. डावाच्या 15व्या षटकातील चौथ्या चेंडूवर स्वप्नील सिंगने त्याचा झेल घेतला. यशस्वीने 45 चेंडूत 6 चौकार मारले. मुंबई संघाच्या 64 धावांवर तो पॅव्हेलियनमध्ये परतला. उत्तराखंडची कमान जय बिश्तकडे आहे.
तत्पूर्वी, पाऊस आणि खराब हवामानामुळे मुंबई विरुद्ध उत्तराखंड रणजी करंडक उपांत्यपूर्व फेरीतील सामना ओल्या आउटफिल्डमुळे लांबणीवर पडला होता. मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.त्याचवेळी कर्नाटक विरुद्ध यूपी आणि पंजाब विरुद्ध मध्य प्रदेश यांच्यातील सामनेही उशिरा सुरू झाले.