Prithvi Shaw : रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात पृथ्वी शॉ भडकला, अंपायरशी जोरदार वाद

WhatsApp Group

Prithvi Shaw : सध्या रणजी ट्रॉफीमध्ये मुंबई आणि मध्य प्रदेश यांच्यात अंतिम सामना खेळला जात आहे. या सामन्याच्या पहिल्या डावात मध्य प्रदेशने 536 धावा केल्या. मध्य प्रदेशच्या फलंदाजांनी जबरदस्त खेळ दाखवला. दरम्यान या मॅचमध्ये पृथ्वी शॉ रागावला आणि अंपायरशी वाद घालताना दिसला. आता त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मोहित अवस्थी मुंबईसाठी डावातील 125 वे षटक करत होता. तेव्हा मध्य प्रदेशकडून रजत पाटीदार आणि आदित्य तरे फलंदाजी करत होते. त्यानंतर मोहितचा चेंडू फलंदाजाच्या पॅडला लागला, त्यावर गोलंदाजाने मोठे अपील केले, पण पंचांनी खेळाडूला नॉट आउट दिले. या निर्णयानंतर मुंबईच्या खेळाडूंना आश्चर्याचा धक्का बसला. त्यानंतर मुंबईचा कर्णधार पृथ्वी शॉ अंपायरशी वाद घालताना दिसला.

कर्णधार पृथ्वीला खूप राग आला त्यामुळे त्याने बराच वेळ पंचांशी वाद घातला. या घटनेचा रिप्ले पाहिल्यावर अंपायरचा निर्णय योग्य होता आणि त्या चेंडूवर फलंदाज नाबाद असल्याचे स्पष्ट झाले.