पृथ्वी शॉ बनला आलिशान अपार्टमेंटचा मालक; किंमत तब्बल ‘इतके’ कोटी

WhatsApp Group

पृथ्वी शॉ उंचीने लहान आहे मात्र त्याची स्वप्ने नेहमीच मोठी राहिली आहेत. त्याने आपल्या स्वप्नांना पंख दिले आणि तो यशाची शिडी चढत गेला. तो अवघ्या चार वर्षांचा असताना त्याच्या आईचे निधन झाले. यानंतर त्याच्या वडिलांनी त्याची काळजी घेतली आणि त्याला क्रिकेट खेळण्यासाठी प्रेरित केले.

पृथ्वी शॉच्या वडिलांनीही आपल्या मुलाच्या क्रिकेटच्या मागे त्यांनी आपला व्यवसाय सोडला होता, कारण त्यांना खात्री होती की मुलगा आपलं नाव मोठं करेल आणि तसे झाले.आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणाऱ्या पृथ्वी शॉने मुंबईत महागडे घर घेतले आहे. यापूर्वी त्यांनी महागडी कारही घेतली होती.

स्वतःचे घर घेणे किंवा बांधणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. उजव्या हाताचा फलंदाज पृथ्वी शॉनेही हे स्वप्न साकार केले आहे. पृथ्वी शॉने वांद्रे रेक्लेमेशन, मुंबई येथे एक प्रीमियम निवासी अपार्टमेंट खरेदी केले आहे. त्याची किंमत साडे दहा कोटी रुपये आहे. पृथ्वी शॉने खरेदी केलेल्या प्रीमियम अपार्टमेंटचे कार्पेट क्षेत्र 2209 स्क्वेअर फूट आहे, तर टेरेस 1654 स्क्वेअर फूट आहे. त्याचे अपार्टमेंट प्रोजेक्ट 81 ऑरिएट येथे आहे. त्याच्या मुद्रांक शुल्कावर 52.50 लाख रुपये खर्च झाले आहेत.

पृथ्वी शॉने वयाच्या 18व्या वर्षी कसोटीमध्ये पदार्पण केले, राजकोट येथे वेस्ट इंडिजविरुद्ध खेळताना पदार्पणातच कसोटी शतक झळकावणारा सर्वात तरुण भारतीय खेळाडू ठरला. तो इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळतो. आयपीएल 2022 पूर्वी दिल्ली कॅपिटल्सने त्याला कायम ठेवले होते. तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईचे प्रतिनिधित्व करतो.