Viral Video : फक्त 10 मिनिटं उशीर झाल्यामुळे शाळेच्या मुख्याध्यापकाने शिक्षिकेला चप्पलने केली मारहाण

WhatsApp Group

सध्या सोशल मीडियावर (Social Media) एका धक्कादायक घटनेचा व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत आहे. शाळेच्या मुख्याध्यापकाने महिला शिक्षिकेला चप्पलने बेदम माराहण केली आहे. महत्वाचे म्हणजे शाळेच्या विद्यार्थ्यांसमोर हा सर्व प्रकार घडला आहे. शिक्षिका शाळेत उशिरा आल्यामुळे मुख्याध्यापकाचा रागावरील ताबा सुटला आणि त्याने शिक्षिकेला बेदम मारहाण (School Teacher Video) केली आहे.

या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हाला देखील राग आल्याशिवाय राहणार नाही. या घटनेचा तीव्र निषेध केला जात आहे. हा मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटिझन्स त्यावर संतप्त प्रतिक्रिया देत आहेत.