पंतप्रधानांनी देशवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या दिल्या शुभेच्छा

0
WhatsApp Group

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. अमृत काळात भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचा संकल्प अधिक बळकट करण्याचे त्यांनी आवाहन  केले.

पंतप्रधानांनी ट्विट केले:

“तुम्हा सर्वांना  स्वातंत्र्यदिनाच्या अनेक अनेक शुभेच्छा. चला, या ऐतिहासिक प्रसंगी अमृत काळात भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचा संकल्प अधिक बळकट करूया. जय हिंद !
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आपल्या महान स्वातंत्र्यसैनिकांना आपण आदरांजली वाहतो आणि त्यांचे स्वप्न साकारण्याप्रती आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करतो. जय हिंद!