VDNKh येथील रोसाटॉम पॅव्हेलियनला पंतप्रधानांनी दिली भेट

WhatsApp Group

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासमवेत आज मॉस्को येथील ऑल रशियन प्रदर्शन केंद्र, VDNKhला भेट दिली.

दोन्ही नेत्यांनी VDNKh येथील रोसाटॉम  पॅव्हेलियनचा दौरा केला. नोव्हेंबर 2023 मध्ये उद्घाटन झालेले रोसाटॉम पॅव्हिलियन हे वैज्ञानिक आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगतीच्या इतिहासावरील सर्वात मोठ्या प्रदर्शनांपैकी एक आहे. नागरी अणुऊर्जा क्षेत्रातील भारत-रशिया सहकार्याला समर्पित छायाचित्र प्रदर्शनालाही  पंतप्रधानांनी भेट दिली. भारतातील कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्प (KKNPP) मधील  VVER-1000 अणुभट्टीचे कायमस्वरूपी कार्यरत मॉडेल- “ॲटॉमिक सिम्फनी” पंतप्रधानांना दाखवण्यात आले.

पॅव्हेलियनमध्ये पंतप्रधानांनी भारतीय आणि रशियन विद्यार्थ्यांच्या समूहाशी संवाद साधला. भावी पिढ्या आणि या ग्रहाच्या फायद्यासाठी उपयुक्त ठरू शकणाऱ्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातल्या भविष्यातील संधींचा शोध घेण्यासाठी त्यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले.