नवी दिली – भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी Prime Minister Narendra Modi यांनी लोकसभेत काँग्रेसला फटकारत हा पक्ष फुटीरतावादी पक्ष असल्याचे म्हटले आहे. राहुल गांधींच्या Rahul Gandhi तामिळनाडूबाबतच्या वक्तव्यावर पंतप्रधान मोदींनी काँग्रेसला घेरत चांगलाच समाचार घेतला.
तमिळांच्या भावना भडकवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे पीएम मोदी म्हणाले. काँग्रेसने ब्रिटिशांप्रमाणेच धोरण स्वीकारले आहे. ‘राष्ट्र’ हा शब्द घटनेत नाही, असे सांगून अवमान केला जात आहे. ते म्हणाले की, राष्ट्र हा आपल्यासाठी जिवंत आत्मा आहे. राष्ट्र म्हणजे सरकारची व्यवस्था नसल्याचेही त्यांनी म्हटले.
पीएम मोदी म्हणाले, “जेव्हा आमचे सीडीएस जनरल बिपिन रावत यांचे दक्षिणेत हेलिकॉप्टर अपघातात अचानक निधन झाले आणि त्यांचे पार्थिव तामिळनाडूतील विमानतळाकडे जात असताना, माझे तमिळ बंधू-भगिनी तासनतास लाखोंच्या संख्येने रांगेत उभे होते. जेव्हा सीडीएस रावत यांचे पार्थिव तेथून बाहेर येत होते, तेव्हा प्रत्येक तमिळ नागरिक अभिमानाने हात वर करून डोळ्यात अश्रू आणून म्हणत असत, वीर वननकम, वीर वननकम. हा माझा देश आहे. मात्र काँग्रेसने या गोष्टींचा नेहमीच तिरस्कार केला आहे.
काँग्रेसवर हल्लाबोल करताना पीएम मोदी म्हणाले की, त्यांच्या डीएनएमध्ये फूट पाडणारी मानसिकता घुसली आहे. इंग्रज निघून गेले, पण काँग्रेसने फूट पाडा आणि राज्य करा हे धोरण आपले चारित्र्य बनवले आहे.
त्यामुळेच आज काँग्रेस तुकडे तुकडे टोळीचा म्होरक्या बनली आहे. ते म्हणाले की, काँग्रेस पक्षाची सत्तेत येण्याची इच्छा संपली आहे. पण जेव्हा काही मिळणार नाही, तेव्हा निदान काहितरी बिघडवा, या तत्वज्ञानावर आज काँग्रेस चालत आहे.
हेही वाचा
धक्कादायक! जेवण उशिरा बनवल्याने पत्नीला डिझेल ओतून जिवंत जाळलं
८ महिन्यांच्या बाळासोबत मोलकरीणीने केलेलं हे कृत्य ऐकून अंगावर उभा राहिल काटा!