भगव्या रंगाचे कपडे, गळ्यात रुद्राक्षाची माळ….पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं गंगेत स्नान, पाहा व्हिडिओ

WhatsApp Group

पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयागराजला पोहोचले आणि संगमात स्नान केले. पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री योगी यांच्यासोबत बोटीने संगमला पोहोचले आणि नंतर त्यांनी संगमात डुबकी मारली. यावेळी पंतप्रधानांनी भगवे रंगाचे कपडे घातले होते आणि त्यांच्या गळ्यात रुद्राक्षाची माळ होती. मंत्र पठण करताना, पंतप्रधान मोदींनी संगमात एकटेच डुबकी मारली. स्नान केल्यानंतर पंतप्रधानांनी मंत्रांचा जपही केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी विमानाने बामरौली विमानतळावर पोहोचले. जिथे राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी त्यांचे स्वागत केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयागराजमध्ये दोन तास राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by inside marathi (@insidemarathinews)

महाकुंभ २०२५ पौष पौर्णिमेला १३ जानेवारी रोजी सुरू झाला, ज्यामध्ये कोट्यवधी भाविक सहभागी होण्यासाठी पोहोचले होते. हे २६ फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीपर्यंत सुरू राहील. उत्तर प्रदेश सरकारच्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत ३८ कोटींहून अधिक भाविकांनी संगमात स्नान केले आहे.