पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पहिला ‘लता दीनानाथ मंगेशकर’ पुरस्कार प्रदान

WhatsApp Group

पंतप्रधान नरेंद्र मोदी यावर्षीपासून सुरू झालेल्या ‘लता दीनानाथ मंगेशकर’ पुरस्काराचे पहिले मानकरी ठरले आहेत. सर्वोत्कृष्ट देशसेवा आणि जनसेवेसाठी त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. त्यानंतर आज(रविवार) मुंबईमधील षण्ङमुखानंद सभागृहामध्ये हा पुरस्कार वितरण समारंभ पार पडला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

या कार्यक्रमाला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, उषा मंगेशकर, आशा भोसले, आदिनाथ मंगेशकर, उद्योगमंत्री सुभाष देसाई, भाजपा नेते विनोद तावडे आदींची उपस्थिती होती.