
राजकोट – पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) आज गुजरात दौऱ्यावर आहेत. यावेळी मोदींच्याहस्ते राजकोट येथील अटकोट येथे मातोश्री केडीपी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांनी देशाला संबोधित केले. ‘ज्यावेळी लोकांच्या प्रयत्नांना सरकारची जोड मिळते, त्यावेळी आम्हाला काम करण्याची ताकद मिळत असते. यावेळी त्यांनी मोदी सरकारला आठ वर्ष पूर्ण झाल्याचे सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी बोलताना म्हणाले, या सरकारच्या आठ वर्षाच्या काळात आम्ही कोणतेच असे कोम केळे नाही, ज्याने लोकांची मान खाली जाईल. ६ कोटी कुटुंबांना पाणीपुरवठा करण्यात आला आहे. गरिबांचा सन्मान राखला आहे. यासोबतच ३ कोटींहून अधिक गरिबांना घरे देण्यात आली. अडचणीचा काळ असताना थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले. जेव्हा कोरोनाच्या काळात उपचारांची गरज वाढली तेव्हा आम्ही चाचणी वाढवली. जेव्हा लसीची गरज भासली तेव्हा लस मोफत दिली.
Building India of dreams of Bapu, Sardar Patel, says PM Modi on 8 years of NDA govt
Read @ANI Story | https://t.co/nydtTApyd2#PMModiInGujarat #PMModi #SardarPatel #8YearsOfModiGovt #8YearsOfModiGovernment pic.twitter.com/vdtkiH5DeO
— ANI Digital (@ani_digital) May 28, 2022
‘आम्ही गरीबांची सेवा, सुशासन आणि गरिबांचे कल्याण याला प्राधान्य दिले आहे. सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास या मंत्राला अनुसरून आपण देशाच्या विकासाला नवी गती दिली. आज जेव्हा मी गुजरातच्या भूमीवर आलो आहे, तेव्हा मला माथा टेकून गुजरातच्या सर्व नागरिकांचा आदर करावासा वाटतो, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले. मी दिलेले संस्कार आणि शिक्षणामुळे मातृभूमीच्या सेवेत कोणतीही कसर सोडली नाही, समाजासाठी कसे जगायचे हे शिकवले, असेही नरेंद्र मोदी यावेळी बोलताना म्हणाले.