भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने आंतरराष्ट्रीय टी-20 फॉरमॅटला अलविदा केला आहे. आता भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रवींद्र जडेजाच्या निवृत्तीवर पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये पीएम मोदींनी रवींद्र जडेजाचे खूप कौतुक केले आहे.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे – प्रिय रवींद्र जडेजा, तुम्ही अष्टपैलू म्हणून शानदार खेळ दाखवला आहे. टी-20 फॉरमॅटमध्ये तुमच्या योगदानाबद्दल धन्यवाद.
Dear @imjadeja,
You have performed exceptionally as an all-rounder. Cricket lovers admire your stylish stroke play, spin and superb fielding. Thank you for the enthralling T20 performances over the years. My best wishes for your endeavours ahead.
— Narendra Modi (@narendramodi) June 30, 2024
याआधी रवींद्र जडेजाने इन्स्टाग्रामवर पोस्ट करून निवृत्तीची माहिती दिली होती. या पोस्टमध्ये त्याने लिहिले की, ” मी टी-20 आंतरराष्ट्रीय करिअरला अलविदा म्हणत आहे.” मी माझ्या देशासाठी नेहमीच 100 टक्के दिले आहेत आणि देत राहीन… टी-20 विश्वचषक जिंकणे हे एक स्वप्न सत्यात उतरले आहे.
View this post on Instagram
टी-20 विश्वचषक फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या विजयानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी आंतरराष्ट्रीय टी-20 फॉरमॅटला अलविदा केला. मात्र, आता या यादीत रवींद्र जडेजाही सामील झाला आहे. अशाप्रकारे टी-20 वर्ल्ड कप चॅम्पियन बनल्यानंतर भारताच्या तीन मोठ्या खेळाडूंनी फॉरमॅटला अलविदा केला आहे.