पीएम मोदींनी नेताजी सुभाष चंद्र बोस यांना वाहिली आदरांजली

WhatsApp Group

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पराक्रम दिनानिमित्त नेताजी सुभाषचंद्र बोस यांना आदरांजली वाहिली आहे. आपल्या ट्वीटमध्ये पंतप्रधानांनी म्हटले आहे; आज, पराक्रम दिनानिमित्त मी नेताजी सुभाषचंद्र बोस यांना आदरांजली वाहत आहे आणि भारताच्या इतिहासातील त्यांच्या अविस्मरणीय योगदानाचे स्मरण करत आहे. वसाहतवादी राजवटीला त्यांनी केलेल्या प्रखर विरोधासाठी ते कायम स्मरणात राहतील. त्यांच्या विचारांनी खोलवर प्रभावित होउन आम्ही त्यांचे भारतासाठीचे स्वप्न साकार करण्यासाठी काम करत आहोत.”