पंतप्रधानांनी BSF स्थापना दिनानिमित्त जवानांना दिल्या शुभेच्छा

WhatsApp Group

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी प्रमुख सुरक्षा दलाच्या जवानांना स्थापना दिनानिमित्त अभिवादन केले आणि त्यांच्या शौर्याचे कौतुक केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केले की, “बीएसएफच्या स्थापना दिनानिमित्त सर्व बीएसएफ जवानांना आणि त्यांच्या कुटुंबियांना शुभेच्छा. हे एक सुरक्षा दल आहे ज्याचा भारताचे रक्षण करण्याचा आणि अत्यंत समर्पणाने आपल्या देशाची सेवा करण्याचा उत्कृष्ट इतिहास आहे.

नैसर्गिक आपत्तीसारख्या आव्हानात्मक परिस्थितीत बीएसएफने केलेल्या उदात्त कार्याचेही मला कौतुक वाटते.भारताच्या सीमांचे रक्षण करण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी रोखण्यासाठी बीएसएफची स्थापना सन 1965 मध्ये करण्यात आली. बीएसएफ केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाच्या अंतर्गत येते. बांगलादेशच्या स्वातंत्र्यात ‘सीमा सुरक्षा दल’ची महत्त्वाची भूमिका अविस्मरणीय आहे.

Inside मराठीचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा