मार्चच्या पहिल्याच दिवशी महागाईचा फटका, दुधापाठोपाठ गॅस सिलिंडरही महाग, जाणून घ्या किती वाढले दर

WhatsApp Group

नवी दिल्ली – मार्चचा पहिला दिवस ग्राहकांसाठी महागाई घेऊन आला आहे. दुधापाठोपाठ आता एलपीजी गॅस सिलिंडरही महागला आहे. १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत १०५ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. वाढलेले दर आजपासून लागू झाले आहेत. या वाढीनंतर दिल्लीत सिलिंडरची किंमत २,०१२ रुपयांवर गेली आहे.

यासोबतच पाच किलोच्या सिलिंडरमध्ये २७ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. दिल्लीत त्याची किंमत आता ५६९ रुपयांवर गेली आहे. घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. तेल कंपन्या दर महिन्याला एलपीजी सिलिंडरच्या किमतीत बदल करतात. १ फेब्रुवारी रोजी १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमतीत ९१.५० रुपयांनी कपात करण्यात आली होती. वाढलेल्या या किंमतीचा परिणाम घरच्या बजेटवर दिसून येणार आहे.