महाविकास आघाडीतून बाहेर पडायला तयार’; संजय राऊत यांचं मोठं वक्तव्य

WhatsApp Group

मुंबई – संजय राऊत यांनी आता बंडखोर आमदारांना 24 तासात परत येण्याचं आवाहन केलं आहे. तुम्ही परत या. सरकारमधून बाहेर पडण्याबाबत विचार होईल. तुमचं म्हणणं आम्ही ऐकून घेऊ. तुमच्या भूमिकेवर विचार करू, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

दरम्यान आपल्या पत्रकार परिषदेत बोलताना संजय राऊत यांनी अनेक मोठे खुलासे केले आहेत. आमदारांचं अपहरण करून भाजपने त्यांना आपल्यासोबत नेलं आहे. सर्वांना गुलाम बनवण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे.