नवी दिल्ली – ‘महाराष्ट्रातील जैवविविधता मानके’ या विषयावरील महाराष्ट्राचा चित्ररथ ७३व्या प्रजासत्ताकदिनी दिल्लीतील राजपथावरील पथसंचलनासाठी सज्ज झाला आहे. दिल्लीच्या कँटोन्मेट परिसरातील रंगशाळेत या चित्ररथाच्या अंतिम टप्प्याचे काम पूर्णत्वास येत आहे.
महाराष्ट्राचा ‘शेकरू’ हा राज्यप्राणी, ‘ब्ल्यू मॉरमॉन’ फुलपाखरू यासह राज्यातील जैवविविधता चित्ररथाच्या माध्यमातून मांडण्यात आली आहे. राज्य शासनाने प्राणी,पक्षी व अन्य जीवांसाठी राखीव ठेवलेल्या अभयारण्यातील दुर्मिळ वनस्पती व प्राण्यांच्या प्रजातीही चित्ररथावर दर्शविण्यात आल्या.
आंतरराज्यीय- सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धेत महाराष्ट्राला प्रथम पारितोषिक
प्रजासत्ताक दिनानिमित्त, दिल्ली येथील रंगशाळेमध्ये आंतरराज्यीय- सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धेत महाराष्ट्राला प्रथम पारितोषिक मिळाले. एकूण पंधरा संघ सहभागी असणाऱ्या या स्पर्धेत, महाराष्ट्राने गोंधळ या लोककला प्रकाराचे अप्रतिम सादरीकरण करून प्रथम क्रमांक पटकाविला.