काय सांगता! वयाच्या ४६ व्या वर्षी जुळ्या मुलांची आई बनली प्रिती झिंटा!

WhatsApp Group

मुंबई – भारतातील लोकप्रिय अभिनेत्री आणि आयपीएलचा संघ पंजाब किंग्जची मालकिन प्रिती झिंटा (preity zinta) ही अनेकदा चर्चेत असते. ती दररोज सोशल मीडियावर काहीना काही फोटो शेअर करत असते. अलीकडेच वयाच्या ४६ व्या वर्षी ती जुळ्या मुलांची आई झाली आहे. प्रिती झिंटाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत याबाबतची माहिती आपल्या चाहत्यांना दिली आहे. ही पोस्ट शेअर करताच तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

मुलांची नावे काय आहेत

प्रिती झिंटाने या मुलांचे नाव जय आणि जिया ठेवले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे प्रिती झिंटा सरोगसीच्या मदतीने आई बनली आहे. प्रिती झिंटाने पोस्ट शेअर करत आनंद व्यक्त केला आहे. पोस्ट शेअर करताना प्रिती झिंटाने लिहिलं आहे की, सर्वांना नमस्कार, मला तुमच्यासोबत एक चांगली बातमी शेअर करायची आहे. आज आम्ही आमच्या कुटुंबात जुळ्या मुलांचे जय आणि जियाचे स्वागत केल्यामुळे मला आणि माझा नवरा जीनला खूप आनंद झाला आहे.

प्रिती झिंटा आणि जीन गुडइनफ यांनी २०१६ मध्ये फेब्रुवारी महिन्यात लग्न केले होते. तब्बल ५ वर्षांनंतर दोघांना सरोगसीच्या मदतीने जुळी मुले झाली. त्यामुळे प्रिती झिंटा आणि जीन गुडइनफ खूप आनंदी दिसत आहेत. पती जीनसोबतचा फोटो शेअर करताना प्रितीने लिहिले की, आमच्या घरी जुळी मुले आली आहेत. त्यातील एक मुलगा आणि एक मुलगी आहे.

सोशल मीडियावर प्रितीने आपण आई झाल्याची पोस्ट शेअर करताच जगभरातील चाहते या जोडप्याचं अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत. काही मिनिटांतच प्रितीची ही पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली होती. आता प्रितीच्या दोन्ही मुलांची झलक पाहण्यासाठी चाहते आतुर झाले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Preity G Zinta (@realpz)