
PM Matritva Vandana Yojana: केंद्र आणि राज्य सरकारकडून जनतेसाठी विविध योजना राबवल्या जातात. केंद्र सरकारच्या अशाच एका योजनेबाबत आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत. या योजनेचं नाव प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना असं आहे. भारत सरकारने या योजनेची सुरुवात 2017 मध्ये केली होती. देशातील गरीब आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या गरोदर महिलांना या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो.
या योजनेंतर्गत गरोदर महिलेला 6 हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात येते. या माध्यमातून आरोग्य संदर्भातील सुविधा, चांगला आहार देण्याचा हेतू आहे. मातृत्व वंदना योजनेचा लाभ कसा घ्यावा जाणून घेऊया.
प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेंतर्गत, सरकारकडून गरोदर महिलांना चार टप्प्यांमध्ये 6,000 रुपयांची आर्थिक करण्यात येते. याअंतर्गत पहिल्या टप्प्यात 1 हजार रुपये, दुसऱ्या टप्प्यात 2 हजार, तिसऱ्या टप्प्यात 2 हजार आणि बाळाच्या जन्माच्या वेळी 1 हजार रुपये दिले जातात.
अर्ज कुठे करावा
यासाठी https://wcd.nic.in/schemes/pradhan-mantri-matru-vandana-yojana संकेतस्थळायवर क्लिक करून अर्ज करू शकता. याशिवाय, तुम्ही प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेत ऑफलाइन देखील अर्ज करू शकता.
INSIDE मराठीचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा