लता मंगेशकर यांच्या निधनानंतर मनोरंजन विश्वातून आणखी एक वाईट बातमी समोर आली आहे. महाभारत मालिकेत भीमाची भूमिका साकारणारे प्रवीण कुमार यांचे वयाच्या ७४ व्या वर्षी निधन झाले आहे. ते अनेक दिवसांपासून आजारझुंज देत होते. त्यांनी आपल्या उंची आणि मजबूत शरीराच्या जोरावर खेळाडू म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली.
Praveen Kumar Sobti, popular for playing the role of Bheem in BR Chopra’s Mahabharat, passed away today in Delhi. He will be cremated at the crematorium ground in Punjabi Bagh today. pic.twitter.com/0yzp4AMmzx
— ANI (@ANI) February 8, 2022
त्यानंतर ते हिंदी चित्रपटांकडे वळले. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये खलनायकाच्या भूमिका केल्या, पण त्यांना प्रसिद्धी महाभारतातून मिळाली, ज्यात त्यांनी भीमाची भूमिका केली. फार कमी लोकांना माहित असेल की प्रवीण कुमारने आपल्या अभिनय कारकिर्दीत अमिताभ बच्चन आणि जितेंद्र यांसारख्या सुपरस्टार्ससोबतही काम केले होते.