गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आज दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. प्रमोद सावंत यांनी शपथविधी सोहळ्याबाबत सांगितले की, या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि अनेक केंद्रीय मंत्री उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर या सोहळ्याला अनेक धर्मगुरूही उपस्थित राहणार आहेत. पणजीतील श्यामा प्रसाद मुखर्जी स्टेडियमवर सकाळी 11 वाजता शपथविधी सोहळा आयोजित केला जाईल.
भाजपने याआधीच गोव्याचे राज्यपाल पीएस श्रीधरन पिल्लई यांना 25 आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र सादर केले आहे. पिल्लई यांनी राज्यात पुढील सरकार स्थापन करण्यासाठी भाजपला निमंत्रण दिले आहे. प्रमोद सावंत यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी एकमताने निवड करण्यात आली आहे.
दुसरीकडे, 40 सदस्यांच्या गुजरात विधानसभेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत भाजपने 20 जागा जिंकल्या होत्या, जे बहुमताच्या आकड्यापेक्षा फक्त 1 कमी आहे.
डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी स्टेडियमवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, अमित शहा आणि अनेक केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीत सकाळी 11 वाजता हा सोहळा होणार आहे.