Prakash Ambedkar on Sanjay Raut: वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केला आहे. त्यांनी संजय राऊत यांच्यावर खोटे बोलल्याचा आरोपही केला आहे. आंबेडकर म्हणाले, संजय राऊत किती खोटं बोलणार? तुमची आणि माझी मते सारखीच असतील तर तुम्ही आम्हाला बैठकीला का बोलावत नाही? फोर सीझन्स हॉटेलमध्ये 6 मार्चला झालेल्या बैठकीनंतर तुम्ही आमच्या कोणत्याही प्रतिनिधीला का बोलावले नाही? असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी विचारला आहे.
प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले, वंचितला आमंत्रण न देता आजही बैठक का घेत आहात? सहयोगी असून तुम्ही पाठीवर वार केलेत! सिल्व्हर ओक्स इथल्या मीटिंगमध्ये तुमचे वागणं कसं होतं हे आम्हाला माहीत आहे. अकोल्यात आमच्या विरोधात उमेदवार उभा करण्याचा मुद्दासुद्धा तुम्ही उपस्थित केला हे खरे नाही का? तुम्ही कोणत्या प्रकारचे नाते निर्माण करत आहात? एकीकडे तुम्ही युतीचा आभास दाखवत आहात तर दुसरीकडे आम्हाला पाडण्याचे कारस्थान करत आहात. हे तुमचे विचार आहेत?,” असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी विचारला आहे.
संजय, कितना झूठ बोलोगे!?
अगर आपके और हमारे विचार एक हैं तो हमें बुलाते क्यों नहीं हैं मीटिंग में?
6 मार्च की फोर सीजन्स होटल मैं हुई बैठक के बाद आपने हमारे किसी प्रतिनिधि को आमंत्रित क्यों नहीं किया?
आज भी आप वंचित को आमंत्रित किए बिना क्यों बैठक कर रहे है?
आपने तो सहयोगी… pic.twitter.com/EMbHh6VFME
— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) March 28, 2024
गेल्या अनेक दिवसांपासून एमव्हीए आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात जागावाटपाबाबत चर्चा सुरू होती. महाविकास आघाडीने वंचित बहुजन आघाडीला चार जागा देऊ केल्या होत्या, मात्र प्रकाश आंबेडकर जास्त जागांची मागणी करत होते. दोघांमध्ये जागावाटपावर कोणताही करार झालेला नाही. काही दिवसांपूर्वी आंबेडकरांनी अचानक घेतलेल्या निर्णयाने सर्वांनाच चकित केले होते. महाविकास आघाडीसोबतची युती तोडत असल्याची घोषणा त्यांनी केली.
यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी मोठी घोषणा केली. आगामी लोकसभा निवडणूक आता एकट्याने लढवणार असल्याचे त्यांनी सांगितले. यासोबतच त्यांनी आठ जागांवर आपले उमेदवार उभे केले. ते स्वतः अकोल्यातून निवडणूक लढवणार आहेत.