राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजित पवारांसह नऊ जणांवर शिस्तभंगाची कारवाई केल्यानंतर राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी जयंत पाटलांचं प्रदेशाध्यक्षपद काढून घेतलं आहे. त्याऐवजी राष्ट्रवादीचे नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून सुनिल तटकरे यांची नियुक्ती केली आहे.
तसेच मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना प्रफुल्ल पटेल म्हणाले की, अजित पवारांची विधीममंडळ पक्षनेतेपदी नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी केली. तसेच अनिल भाईदास पाटील यांची महाराष्ट्र विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रतोदपदी नियुक्ती करण्यात आली आहे,” अशी माहिती प्रफुल्ल पटेल यांनी दिली. ( Praful Patel Sacks Jayant Patil As NCP State President )
Ajit Pawar has been unanimously elected as the leader of the legislature party. We have informed Maharashtra Assembly Speaker about our decision: NCP leader Praful Patel pic.twitter.com/QifP94eQ9f
— ANI (@ANI) July 3, 2023