प्रभासने सांगितले लग्न कधी करणार, म्हणाला – या बॉलिवूड अभिनेत्यानंतर येणार माझा नंबर!

WhatsApp Group

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीपासून बॉलिवूडपर्यंत नाव कमावणारा साऊथचा सुपरस्टार प्रभास सिनेविश्वात खूप लोकप्रिय आहे. आपल्या अभिनयाच्या जोरावर ‘बाहुबली’ प्रभासने लोकांच्या मनात एक खास स्थान निर्माण केले आहे. अलीकडेपर्यंत, अभिनेत्याचे नाव ‘आदिपुरुष’ची मुख्य अभिनेत्री क्रिती सेनॉनशी जोडले जात होते. पण क्रिती सेननच्या एका वक्तव्याने हे नाते निव्वळ अफवा असल्याचे म्हटले आहे. मात्र, प्रभासच्या लग्नाचा आणि नात्याचा मुद्दा अजूनही चर्चेत आहे. अशा परिस्थितीत आता साऊथ सुपरस्टारने आपल्या लग्नाबाबत मौन तोडत एक विधान केले आहे, जे जोरदार व्हायरल होत आहे.

साऊथचा सुपरस्टार प्रभासचे नाव ‘बाहुबली’ फेम अनुष्का शेट्टी ते ‘आदिपुरुष’ क्रिती सेनॉनसोबत जोडले गेले आहे. परंतु दोन्ही अभिनेत्रींनी या बातम्यांना निव्वळ अफवा सांगून संपुष्टात आणले, त्यानंतर अभिनेत्याचे चाहते दु:खी झाले. खरं तर, अभिनेत्याच्या चाहत्यांना त्याला लवकरच लग्नबंधनात बघायचे आहे. दरम्यान, आता प्रभासने एका टॉक शोमध्ये आपल्या लग्नाबद्दल उघडपणे बोलले आहे. अभिनेता नंदामुरी बालकृष्णने होस्ट केलेल्या शोचा प्रोमो व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये प्रभासने त्याच्या लग्नावर मौन सोडले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by ahavideoin (@ahavideoin)

‘अनस्टॉपेबल 2’ या टॉक शोचा एक प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला होता. प्रभासने त्यावेळी चाहत्यांसमोर त्याच्या लग्नाबद्दल खुलासा केला आहे. नंदामुरीने प्रभासला विचारले की तुझे लग्न कधी होणार ? हा प्रश्न त्यांनी सहज मजेशीरपणे विचारला. यावर प्रभास म्हणाला, ‘सलमान खाननंतर’ असे उत्तर देत प्रभास जोरजोरात हसायला लागला. त्याचवेळी नंदामुरीसह सर्व प्रेक्षकही या विनोदावर हसू लागले.

Inside मराठीचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा