कर्नाटक – साऊथ स्टार पुनीत राजकुमार याचा जिममध्ये व्यायाम करताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर 46 वर्षीय पुनीतला बेंगळुरूच्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण तो वाचू शकला नाही.
पुनीत राजकुमारच्या निधनामुळे संपूर्ण कर्नाटक राज्यात शोककळा पसरली आहे. राज्यातील सर्व चित्रपटगृहे बंद ठेवण्यात आली आहेत. चाहत्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी शहरातील काही भागात कलम 144 लागू करण्यात आले आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मईसुद्धा रुग्णालयात पोहोचले होते.
Deeply mourning the loss of the irreplaceable icon #PuneethRajkumar. #RIPPuneethRajkumar ???? pic.twitter.com/XNvWzrlGFY
— Sony Music South (@SonyMusicSouth) October 29, 2021
पुनीतने आपल्या करिअरची सुरुवात बालकलाकार म्हणून केली होती, त्याला राष्ट्रीय पुरस्कारानेही गौरविण्यात आले होते. दक्षिण भारतात पुनीत राजकुमारचे करोडो चाहते आहेत.
Karnataka CM Basavaraj Bommai says that the last rites of actor Puneeth Rajkumar will be done with state honours. pic.twitter.com/Cy7D8kCDC1
— ANI (@ANI) October 29, 2021
पुनीतचे वडील राजकुमार हे दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीचे आयकॉन होते. कन्नड चित्रपटसृष्टीतील दादासाहेब फाळके पुरस्कार प्राप्त करणारे ते पहिले अभिनेते होते.