FIFA World Cup 2022: पोर्तुगालने घानाचा 3-2 ने केला पराभव, ख्रिस्तियानो रोनाल्डोने केला मोठा विश्वविक्रम

WhatsApp Group

FIFA World Cup 2022: फिफा विश्वचषक 2022 मध्ये पोर्तुगालने धमाकेदार सुरुवात केली आहे. पहिल्या सामन्यात ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या संघाने घानाविरुद्ध 3-2 असा विजय मिळवला. सामन्याच्या पूर्वार्धात कोणत्याही संघाने एकही गोल केला नाही, मात्र दुसरा हाफ अतिशय रोमांचक होता. या सामन्यासोबतच रोनाल्डोने एक मोठा विक्रमही आपल्या नावावर केला आहे. पाच वेगवेगळ्या विश्वचषकांमध्ये गोल करणारा तो जगातील पहिला खेळाडू ठरला आहे.

पहिल्या 10 मिनिटांतच पोर्तुगालने सलग तीन वेळा आक्रमण करून आपले इरादे स्पष्ट केले होते. यातील रोनाल्डोचे आक्रमण सर्वात धोकादायक ठरले, त्यात पोर्तुगालला आघाडी घेण्याची चांगली संधी होती. 13व्या मिनिटाला रोनाल्डोने कॉर्नर किकवर हेडरद्वारे गोल करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचा फटका लक्ष्य चुकला. हाफ संपण्यापूर्वी रोनाल्डोने गोल करण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा फटका रोखला गेला. पूर्वार्धात पूर्णपणे पोर्तुगालचे वर्चस्व होते आणि घानाकडून एकही शॉट लागू शकला नाही.

उत्तरार्धाच्या पहिल्या 15 मिनिटांत घानाने अप्रतिम खेळ करत पोर्तुगालवर सातत्याने आक्रमण केले. 62व्या मिनिटाला घानाच्या बचावफळीने चूक केली आणि त्यांनी पेनल्टी कॉर्नर स्वीकारला. रोनाल्डोने पेनल्टीचे गोलमध्ये रूपांतर करत पोर्तुगालला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. मोहम्मद कुदुसने घानासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न केले आणि 71व्या मिनिटाला लक्ष्यावर फटकेबाजी केली, पण गोल करू शकला नाही. मात्र, पुढच्याच मिनिटाला  कर्णधार आंद्रे इव्हने गोल नोंदवून बरोबरी साधली.

पाच मिनिटांतच पोर्तुगालने पुन्हा सामन्यात आघाडी घेतली. घानाच्या आक्रमणाला रोखल्यानंतर, जोआओ फेलिक्सकडे शानदार फिनिशसह गोल केला. दोन मिनिटांनंतर पोर्तुगालने सामन्यातील तिसरा गोल करत आपली स्थिती मजबूत केली. पोर्तुगालने दुसर्‍या काउंटरद्वारे संधी निर्माण केली आणि बदली खेळाडू म्हणून आलेल्या राफेल लिओने मैदानावर आल्यानंतर तीन मिनिटांतच गोल केला. 88व्या मिनिटाला उस्मान बुकारीने हेडरद्वारे गोल केला. पोर्तुगालने 3-2 ने विजय मिळवला.