रणवीर सिंगच्या न्यूड फोटोंवर पूनम पांडेची प्रतिक्रिया, म्हणाली..’तू मला माझ्याच’

WhatsApp Group

बॉलिवूडचा एनर्जी किंग म्हटला जाणारा अभिनेता रणवीर सिंग सध्या त्याच्या एका फोटोशूटमुळे चांगलाच चर्चेत आहे. रणवीर सिंगने एका मासिकासाठी काही फोटोशूट केले, ज्यामध्ये तो न्यूड (Ranveer Singh Nude Photoshot) दिसत आहे. रणवीरचे हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आणि सर्वसामान्यांसोबतच सेलिब्रिटींनीही त्यावर प्रतिक्रिया दिल्या. रणवीरवर बरेच मीम्स देखील बनवले गेले आणि त्याला खूप प्रशंसा देखील मिळाली. अशा परिस्थितीत कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन पूनम पांडेनेही या फोटोंवर प्रतिक्रिया दिली आहे.

आपल्या सुपर हॉट स्टाईलमुळे चर्चेत राहणारी पूनम पांडेनेही रणवीर सिंगच्या न्यूड फोटोंवर प्रतिक्रिया दिली आहे. रणवीरचे फोटो शेअर करत पूनम पांडेने ट्विटरवर लिहिले की, ‘तू मला माझ्याच खेळात हरवलेस.’

पूनम पांडेही अनेकवेळा न्यूड फोटो आणि व्हिडिओंमुळे चर्चेत आली आहे. पूनम पांडेचे काही न्यूड व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत, तर तिचे काही न्यूड फोटोशूटही व्हायरल झाले आहेत. काही काळापूर्वी गोव्यात पूनम पांडेला अश्लील व्हिडिओ बनवल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. त्याचबरोबर पूनम पांडेच्या अॅपचीही खूप चर्चा झाली आहे. ज्यावर पूनम कथितपणे सेमी न्यूड, न्यूड आणि टॉपलेस फोटो- व्हिडिओ शेअर करते.