Poonam Pandey Death: प्रसिद्ध अभिनेत्री पूनम पांडेचं कॅन्सरने निधन; 32 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

WhatsApp Group

Poonam Pandey: अभिनेत्री पूनम पांडेचं निधन झालं आहे. तिच्या टीमने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ‘पूनमचं गुरुवारी रात्री निधन झालं’, असं तिच्या टीमने एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितलं आहे. पूनमच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट लिहिण्यात आली होती. त्यात तिच्या मृत्यूविषयी सांगण्यात आलं होतं. ‘ही सकाळ आमच्यासाठी खूप कठीण आहे. पूनमचं निधन सर्व्हाइकल (गर्भाशयाच्या) कॅन्सरने झालं आहे’, असं त्यात लिहिलं आहे. अवघ्या 32 व्या वर्षी पूनमने अखेरचा श्वास घेतला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Poonam Pandey (@poonampandeyreal)

या बातमीने केवळ चाहतेच नाही तर संपूर्ण मनोरंजन उद्योगाला धक्का बसला आहे. अचानक ही दुःखद बातमी समोर आली आणि सर्वांनाच धक्का बसला. अभिनेत्रीच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून ही धक्कादायक बातमी काही काळापूर्वी समोर आली आहे. पूनम पांडेच्या ताज्या पोस्टने आता संपूर्ण जगाला मोठा धक्का दिला आहे.

पूनम पांडेच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आलेल्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. काहींनी तिच्या निधनाचे सत्य मान्य केलेले नाही तर काहींनी तिला श्रद्धांजली वाहिली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Poonam Pandey (@poonampandeyreal)

मीडिया रिपोर्ट्सनुसार, आता अभिनेत्रीच्या मॅनेजरने पूनम पांडेच्या मृत्यूच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. काही आठवड्यांपूर्वीच अभिनेत्रीला कॅन्सर झाल्याचं कळलं. इतकंच नाही तर अभिनेत्रीला शेवटच्या स्टेजचा कॅन्सर होता. त्यानंतर ती तात्काळ तिच्या गावी कानपूरला उपचारासाठी गेली. या अभिनेत्रीवर तेथे उपचार सुरू होते. याच ठिकाणी तिने अखेरचा श्वास घेतला. आता तिच्या पार्थिवावर अंतिम संस्कार कधी होणार याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. तसेच, त्यांचे पार्थिव मुंबईत आणले जाईल की त्यांच्या गावी अंत्यसंस्कार केले जातील, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

कंगना राणौतच्या ‘लॉक अप’ या रिॲलिटी शोमधून ती खूप चर्चेत आली. तिच्या बोल्डनेसमुळे ती जगभर प्रसिद्ध होती. केवळ भारतातच नव्हे तर जगभरात तिची चर्चा होती. अशा परिस्थितीत आता अभिनेत्रीच्या निधनाने सर्वजण दु:खी झाले असून तिला श्रद्धांजली वाहताना दिसत आहे.